बहीण आपल्या भावाला राखी बांधते अन् भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी टाकतो. अशात पुण्याच्या ऑटोरिक्षा चालकांनी मनाचा उदारपणा दाखवला आहे
आज रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे. भाऊ बहिणींच्या नात्याचे महत्त्व सांगणारा हा सण आहे. त्यामुळे राज्यात आज उत्साहाचे वातावरण आहे. बहीण आपल्या भावाला राखी बांधते अन् भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी टाकतो.
अशात पुण्याच्या ऑटोरिक्षा चालकांनी मनाचा उदारपणा दाखवला आहे. पुण्यात रक्षाबंधन निमित्त महिला प्रवाशांना रू 100 पर्यंत मोफत रिक्षा प्रवास दिला जाणार आहे.
रक्षाबंधन निमित्त अनेक महिला भगिनी रेल्वेने कुटुंबीयांना भेटायला पुण्याला येत असतात. त्यामुळे ऑटोवाल्या भाऊने पुण्यात येणाऱ्या भगिनींना ओवाळणी देण्याचं ठरवलं आहे.