पुरंदर मधील हजारो मतदारांचा प्रशासकीय इमारती समोर ठिय्या

Photo of author

By Sandhya

पुरंदर मधील हजारो मतदारांचा प्रशासकीय इमारती समोर ठिय्या

पुरंदर तालुक्यातील 32000 मतदारांना निवडणूक विभागाच्या वतीने दुबार नाव असल्याचे नोटीस देण्यात आली होती त्याचबरोबर आज दिनांक 4 जानेवारी रोजी आपले रहिवासी पुरावे घेऊन निवडणूक कार्यालयात हजर राहण्याच्या नोटीस देण्यात आली होती

यानंतर आज चार जानेवारी रोजी पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयावरून मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहेत पुरंदर तालुक्यातील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बाहेर यांवर नागरिकांनी ठिय्या मांडलेला आहे

जवळपास 32 हजार नागरिक हे दुबार मतदार असल्याचं माझे आमदार माझे मंत्री विजय शिवतरे यांनी म्हटलं होतं या संदर्भात त्यांनी पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि त्यांचे नातेवाईक विश्वजीत कदम यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले होते

मात्र यानंतर तालुक्यातील मतदार यादी मध्ये शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांची नावे दुबार असल्याचा आमदार संजय जगताप यांनी दाखवून दिलं होतं मात्र प्रशासनाने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता आमदार संजय जगताप यांनाच दुबार नाव असल्या संदर्भात पुरावे घेऊन निवडणूक विभागात हजर राहण्याच्या नोटीस दिली होती

आणि यानंतर आज सकाळी अकरा वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात मतदार हे सासवड येथील प्रशासकीय इमारतीच्या समोर जमा झालेल्या आहेत आमदार संजय जगताप हे देखील त्यांच्याबरोबर आहेत अनेक वयोवृद्ध लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रश्नाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यात येत आहे

Leave a Comment