राहुल गांधी : “४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …”

Photo of author

By Sandhya

राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचारसभा सुरू आहेत.आज राहुल गांधी बिहार दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.  

“नरेंद्र मोदींनी देवाची गोष्ट अशी मांडली आहे की, ४ जूननंतर ईडीने त्यांना प्रश्न विचारले तर ते सांगतील की, मला काहीच माहिती नाही. देवाने मला काम करायला सांगितले होते.’त्यांनी देवाची गोष्ट का आणली हे त्यांनाच माहीत.

४ जूननंतर जेव्हा तेच ईडीचे लोक नरेंद्र मोदींना गौतम अदानीबद्दल विचारतात तेव्हा ते मला माहीत नाही असे म्हणतील, असा टोलाही गांधी यांनी लगावला.

राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार राजे युग आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना एससी, एसटी आणि ओबीसींचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत. नरेंद्र मोदींनी २२ ते २५ महाराज केले आहेत. त्यांची नवीन नावे आहेत. त्यांची नावे अदानी आणि अंबानी आहेत.

नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी काम करतात. या लोकांचे १६ लाख कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला.  या सभेत राहुल गांधी यांनी तीन मोठी आश्वासनेही दिली.

जर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना रद्द केली जाईल. याशिवाय सर्व महिलांना दरमहा ८५०० रुपये दिले जाणार आहेत. आमचे सरकार आल्यास जे उद्योग बंद पडले आहेत ते सर्व सुरू करू, असंही राहुल गांधी म्हणाले. 

Leave a Comment