विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत मनसे जास्त जागा लढणार आहे. केवळ, निवडणुका लढणार नाही तर त्या जिंकणार आणि राज्यात सत्ता आणणार, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दंड थोपटले आहेत.
‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी बुधवारी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, मनसे काही पहिल्यांदा निवडणूक लढत नाही. २००९, २०१४ मध्येही लढवल्या. आमची कुणासोबत युती नाही किंवा आघाडी नाही. त्यामुळे आम्ही सर्वात जास्त जागा लढविणार आहोत.
जागा लढवायच्या म्हणून लढणार, असे नाही तर पूर्ण जोराने लढणार आहोत. सरकार योजनांच्या माध्यमातून पैसे वाटत आहे. असे फुकट पैसे वाटणे योग्य नाही. अशामुळे राज्य कंगाल होईल.