राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय : अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर

Photo of author

By Sandhya

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर

अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन उद्या गुरुवारी पार पडणार आहे. याच दिवस ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे. पण ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचं मुस्लीम समुदयानं जाहीर केलं आहे.

त्यामुळं गुरुवार अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळं गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी,

२८ सप्टेंबर होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचं योग्य व्यवस्थापन करणं पोलीस प्रशासनाला शक्य व्हावं म्हणून शुक्रवारी २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.

शिष्टमंडळाची विनंती मान्य ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळानं यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.

राज्यात शांततेचं वातावरण असावं आणि गर्दी तसेच मिरवणुकांचं नियोजन करता येणं पोलिसांना शक्य व्हावं म्हणून २९ तारखेला सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.

Leave a Comment