राष्ट्रवादीपक्ष आणि चिन्ह नक्की कोणाचं? आज होणार सुणावणी

Photo of author

By Sandhya

राष्ट्रवादी कोणाची?

शिवसेनेनंतर आता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीपक्ष आणि चिन्ह नक्की कोणाचं? याविषयी पहिली सुनावणी पार आज पडणार आहे. यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल आहे.

शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत. यावेळी या गटाकडून सात ते नऊ हजार शपथपत्र दाखल करण्यात आले आहेत. दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगामध्ये ही सोनावणे होणार आहे.

काल शरद पवार गटाकडून या संदर्भात दिल्लीत कार्यसमितीची एक बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत जर निवडणूक चिन्ह गोठवलं तर पुढची रणनीती काय असेल? याविषयीची चर्चा झाली.

दरम्यान अजित पवार गटापेक्षा शरद पवार गटाने दिलेल्या शपथपत्रांची संख्या जास्त आहे. अजित पवार गटाने काही मृत व्यक्तींची नावे शपथपत्र सादर केली आहेत असे शरद पवार गटाचे म्हणणे आहे.

याच बरोबर त्या शपथ पत्रांमध्ये 60 सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्याचबरोबर अजित पवार गटाने सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये 98 पत्र हे शिक्षक संस्थांच्या कर्मचाऱ्यांची आहेत. असा दावा शरद पवार गटाने केला आहे.

अजित पवार गटापेक्षा शरद पवार गटाची शपथपत्रे ही 4000 हून जास्त असल्याची प्राथमिक माहिती आहे. या सुनावणीला दोन्ही गटाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

मात्र दुसऱ्या फळीतील नेते या ठिकाणी उपस्थित असण्याची शक्यता आहे. पहिल्या सुनावणी वेळी नक्की काय होतं ? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.

Leave a Comment