रोहित पवार : दूध व्यवसायाबाबत चुकीचे धोरण

Photo of author

By Sandhya

रोहित पवार

शेतकर्‍यांना पूरक व्यवसाय म्हणून दुष्काळामध्ये दूध व्यवसायाची मोठी मदत झाली असती. परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज हा व्यवसाय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील दत्तराज डेअरी फार्म या संस्थेचे चेअरमन दीपक भेगडे यांच्या पुढाकारातून संकटात असलेल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी दहा लाख रुपयांचा लाभांश आमदार पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी ते बालेत होते.

यावेळी रघुनाथ काळदाते, सुनील शेलार, किरण पाटील, चेअरमन दीपक भेगडे, सतीश थेटे, अमोल तोरडमळ, भागवत ढोबे, डॉ. समीर ढोबे, विठ्ठल सावंत, सतीश किरदात, राजेंद्र डुबल, एमडी हसन पठाण आदींसह दूध उत्पादक उपस्थित होते.

यावेळी अनिल खरात, रामहरी महानवर, चंद्रकांत कुरळे, पोपट किरदात, दत्तात्रय पवार या दूध उत्पादक शेतकर्‍यांचा आमदार पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

दीपक भेगडे म्हणाले, ग्रामीण भागात दूध व्यवसाय हा शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. शेतकर्‍यांना गाय खरेदी करण्यासाठी बँकांकडून कर्ज देताना मोठ्या प्रमाणात व्याजदर लावला जातो.

मात्र, मोबाईल शून्य टक्के व्याजदराने बाजारात मिळतो. शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबवण्याची गरज असताना तसे होत नसल्याने शेतकरी संकटात आहे. चांगल्या प्रतीचे दूध घालणार्‍या उत्पादकांचा सन्मान करण्यात आला आहे.

Leave a Comment