संजय राऊत : ‘भाजप, आरएसएसचा अजेंडा, म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काळी पट्टी हटवली…’

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

‘न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन्याय करणाऱ्यांचा मुंडका उडवून टाकण्यासाठी असते. समोर किती मोठी व्यक्ती आहे ती श्रीमंत आहे की शक्तिमान आहे ते पाहून मी न्याय करणार नाही यासाठी डोळ्यावर पट्टी असते. पण गेल्या चार वर्षात असं काही न्याय झाला नाही. न्यायालयाच्या काही लोकांनी भारतीय जनता पक्षाला मदत करायचं ठरवलं आहे.

त्यासाठी त्यांनी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढली डोळ्यावरील पट्टी काढली,’ असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत? “गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात संविधान विरोधी सरकार चालू आहे हे सरकार रोज भ्रष्टाचार, अत्याचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नेत्यावर कुठलाही निकाल देण्यास हतबलता दर्शविली.तुम्ही शिवसेना राष्ट्रवादीबाबत निर्णय देऊ शकला नाही. हा आरएसएस भाजपाचा अजेंडा आहे तुम्ही एका पक्षाचा प्रचार करत आहात.

ईव्हीएम संदर्भात घोटाळा होतो परंतु तुम्ही क्लीन चीट दिली आहे. कायद्याचा कारभार करून विरोधी पक्षाला खतम केला जात आहे आणि हे तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहात हा प्रोपोगोंडा आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मुंबईमधील टोल माफीच्या निर्णयावरुन महायुतीवर निशाणा साधला.

“टोल माफी करायची होती तर दोन वर्ष आधी का केली नाही? लाडकी बहीण योजना दोन वर्षांपूर्वी का आणली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आज आमची कदाचित शेवटची बैठक असेल आम्हाला निर्णय घ्यावा लागेल लहान भाऊ मोठा भाऊ हे प्रकरण आमच्यापैकी कोणाच्या डोक्यात नाही. भ्रष्ट सरकारचा पराभव करणे हाच आमचा अजेंडा आहे त्यासाठी दोन पावलं मागे यावे लागले तरी चालतील,” असे संजय राऊतांनी सांगितले.

शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या केलेल्या विधानावरुनही संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले. पवार साहेबांचे तसे संकेत असतील तर त्यावर आम्ही चर्चा करू पण पवार साहेब कुठला संकेत देत नाहीत. एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाहीत अनेकांची नावं चालू आहेत.

हे शेवटी राजकारण आहे लोक कोणाच्या चेहऱ्याकडे जाऊन मतदान करणार आहे हे अख्खा देश जाणतो त्यासाठी घोषणा करायची गरज नाही, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Leave a Comment