संजय राऊत : मुंबई गिळण्याचं गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान…

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

मुंबई गिळण्याचं  गुजराती लॉबीच सर्वात मोठ षडयंत्र आहे. संपुर्ण प्रकल्प पाहाल तेव्हा लक्षात येईल की, भारतीय जनता पक्षाचे जावई अदानी आणि त्यांची कंपनी त्यांना मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावरच केला आहे अशा पद्धतीने राबविला आहे.

भाजपकडून सर्वात मोठा टीडीआर घोटाळा झाला आहे. आधी धारावी आणि नंतर मुंबई गिळण्याचा भाजपाचा डाव आहे. असा आरोप ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

मोर्चा काढू नये म्हणून दिल्लीतुन दबाव   धारावी पूनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज(दि.१६)  अदानींचे बीकेसीतील मुख्यालयवर मोर्चा काढला जाणार आहे.

हा मोर्चा धारावीतून हा मोर्चा थेट अदानींच्या मुख्यालयावर जाणार आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना आरोप केले आहेत की, अदानींविरोधात मोर्चा काढू नये म्हणून दिल्लीतुन दबाव येत आहे.

धारावी पूनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा आहे. पुढे  बोलत असताना ते म्हणाले की, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. मुंबई गिळण्याचं  गुजराती लॉबीच सर्वात मोठ षडयंत्र आहे. असा आरोप त्यांनी केला.

Leave a Comment