सरकार नक्कीच राज्यात धर्मांतर विरोधी कायदा करेल , आमदार राम सातपुतेंचा विश्वास

Photo of author

By Sandhya

आमदार राम सातपुतेंचा विश्वास

हिंदू धर्मांतराचा कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रात लागू करण्यात यावा यासाठी अधिवेशनात लक्षवेधी लावू,त्यानंतर सरकार नक्कीच राज्यात धर्मांतर विरोधी कायदा करेल ,असा विश्वास आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला.

सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनगर्जना मोर्चा काढत लोहिया उद्यानाच्या समोर सभा घेवून हिंदूंचे धर्मांतर थांबवा असा संदेश देण्यात आला.यावेळी आमदार राम सातपुते बोलत होते.

यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे, माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे, माजी नगरसेविका उज्वला जंगले,विजया वाडकर, नाना जंगले, मनोहर देशमुख, भूषण तुपे, संदिप लोणकर, नितीन होले, संदिप दळवी, स्वाती कुरणे, शिवराज घुले, शैलेंद्र बेल्हेकर, रवी तुपे, अभिजीत बोराटे, जीवन जाधव, विकास भुजबळ, डॉ.दादा कोद्रे ,पोपटराव वाडकर , प्रमोद सातव आदिंसह परिसरातील हिंदू बंधू-भगिनी उपस्थित होते.

आमदार राम सातपुते म्हणाले की येथे अनेक वर्षापासून एका महिलेवर बलात्कार होतोय तिने जर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली .तर उलटा तिच्यावर आत्याचार करण्याच्या बाजूने बलात्काराचा गुन्हा दाखल करतात . या पुढे हिंदू असे खोटे गुन्हे खपवून घेणार नाही .

अंधश्रद्धेच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचं काम केलं जात आहे याकडे पोलिसांनी लक्ष द्यायला हवे.आता हिंदू जागृत झाला आहे . लवकरच महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा येईल .या विषयांमध्ये निश्चित येत्या अधिवेशनात लक्षवेधी लावणारा आहे.

माजी आमदार योगेश टिळेकर म्हणाले की गेली अनेक वर्ष शेतकरी बांधव या ठिकाणी राहतात परंतु या आठ- दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या हडपसरच्या पंचक्रोशीत धर्मांतराच अतिक्रमण झालं आहे. हे वेळीच रोखू आणि यासाठी सर्व हिंदू धर्मातील नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे.

Leave a Comment