
शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरिता वेळापत्रक जाहीर
30 जून पासून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
पुणे, दि. 1: शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता शासकीय वसतिगृह प्रवेश हे ऑनलाईन पध्दतीने होणार असून इयत्ता 11 वी, 12 वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशाचे अर्ज https://hmas.mahalt.org. या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येणार आहे. याबाबतचे शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरिता निर्गमित करण्यात आलेल्या वेळापत्रकाचा विचार करुन विहीत कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी अनुक्रमे अर्ज करण्याची मुदत व कंसामध्ये प्रवेशाची यादी प्रसिध्द करावयाचा दिनांक पुढीलप्रमाणे शालेय विद्यार्थी 30 जून (7 जुलै), इयत्ता 11 वी व 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्याकरिता 15 जुलै (31 जुलै) असा आहे.
जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत एकूण 26 मागासवर्गीय मुलां-मुलींची शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये 15 मुलांची व ` मुलींची आहेत. पुणे व पिंपरी-चिचंवड शहरामध्ये एकूण4 शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी मुलांची 9 व मुलींची 5 वसतिगृहे आहेत. तसेच 12 शासकीय वसतिगृहे ही तालुकास्तरावर आहेत.. तरी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी या शासकीय वसतिगृह प्रवेश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. लोंढे यांनी केले आहे.