शहरात तुफानी पावसासह गारपीट; आगामी तीन दिवस सायंकाळी असाच पाऊस पडण्याची शक्यता

Photo of author

By Sandhya

शहरात तुफानी पावसासह गारपीट; आगामी तीन दिवस सायंकाळी असाच पाऊस पडण्याची शक्यता

गुरुवारी दुपारी ३ ते ४ या वेळेत शहरासह आजूबाजूच्या परिसरात तुफानी पावसासह गारपीट झाली. यंदाच्या हंगामातील ही सर्वांत मोठी गारपीट होती. दरम्यान, आगामी तीन दिवस सायंकाळी असाच पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

शहरात गुरुवारी सकाळपासून वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. घामाघूम झाल्याने अस्वस्थ वाटत होते. अशातच दुपारी आभाळ काळ्याभोर ढगांनी भरून आले अन‌् मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा पाऊस घेऊन आला.

त्यातच गारांचा वर्षाव सुरू झाल्याने आबालवृध्दांनी रस्त्यावर येत, पावसात भिजत गारा गोळा केल्या. दुपारी ३ ते ४ चारपर्यंत एकाच वेगाने पाऊस पडत होता. नंतर गारांचा आकार कमी झाला.

Leave a Comment