मुंबईहून आदेश आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना दोष देणार नाही. परंतु ज्यांनी कुणी आदेश दिला, हे पाहणे आवश्यक आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे, मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असे स्पष्ट करत जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत.
त्यामुळे मराठा आंदोलन शांततेने चालू ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.२) पत्रकार परिषदेत केले. जालना जिह्यातील अंतरवली सराटी येथील आंदोलनस्थळी पवार यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
त्यानंतर पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जालन्याच्या बाहेरून तरूण आले होते. मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांशी चर्चा चालू असताना पोलिस मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते.
आंदोलकांनी कायदा हातात घेतला नव्हता, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे लाठीचार्जची घटना गंभीर बाब आहे. राज्य सरकारकडून आंदोलकांना चुकीची वागणूक देण्यात आली, स्त्री, पुरूष न पाहता आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला, असा आरोप पवार यांनी यावेळी केला.