शरद पवार यांची अजित पवार गटावर टीका ; “ईडीच्या भीतीने ते भाजपसोबत”

Photo of author

By Sandhya

शरद पवार

“देशात काही जणांविरोधात ईडीची कारवाई केली जात होती. ईडीच्या कारवाईच्या भीतीने आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आणि आज ते भाजपच्या बाजूला जाऊन बसले आहेत. ते सांगतात आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आहोत.

आम्ही आमची वैचारिक भूमिका बदलली नाही. परंतु, फक्त तुरुंगात जावे लागू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शहरात आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, “सध्या आपल्या राज्यासमोर अनेक प्रश्‍न आहेत. राज्यासमोर महागाई, बेकारी, वाढती गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किंमतीचा प्रश्‍न, उद्योगधंद्यांचे अनेक प्रश्‍न आपल्यासमोर आहेत.

आपल्या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत. राज्यातल्या अशा प्रत्येक प्रश्‍नासंदर्भात जनतेला आस्था आणि चिंता आहे.

गेल्या सहा मिहिन्यात राज्यातले किती कारखाने गुजरातला गेले किंवा अन्य राज्यात गेले? तुम्ही गुजरातमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये कारखाने अवश्‍य काढा, परंतु जे कारखाने इथे येणार होते, महाराष्ट्रात येणार होते, ते तिकडे नेणे योग्य नाही.

या कारखान्यांमुळे इथल्या तरुणांना कामाची संधी मिळणार होती. तो कारखाना तुम्ही इतर राज्यात नेला, त्यामुळे आपल्या तरुणांचा रोजगार गेला, अशा प्रश्‍नांसंदर्भात आता आपण बोलले पाहिजे.’

..जनता त्यांना वेगळ्या ठिकाणी पाठवेल राजकारणात किंवा समाजकारणात सत्याची कास सोडून कोणीतरी असे वागत असेल तर माझी खात्री आहे, की आज ना उद्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना पुढे अडचण झाल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment