शिवाजी पार्क मिळणार कोणाला? ठाकरे गटाची पालिकेला दोन दिवसांची मुदत

Photo of author

By Sandhya

ठाकरे गटाची पालिकेला दोन दिवसांची मुदत

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क ) येथे दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मैदानासाठी केलेल्या अर्जावर दोन दिवसांमध्ये निर्णय घ्या, असा इशारा ठाकरे गटाकडून पालिकेच्या दादर जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आला आहे.

यावर पालिकेने विधी खात्याचा कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी ठाकरे गटासह शिंदे गटानेही अर्ज केला आहे.

अर्ज करून तब्बल महिला लोटला तरी पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दादर- माहीममधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दादर जी- उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेतली.

यावेळी अर्जाबाबत निर्णय का घेतला जात नाही, असा जाब विचारण्यात आला. एवढेच नाही तर शिवाजी पार्कवरच ठाकरे गटाचा मेळावा ६ होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

पालिकेच्या विधी विभागाचा कायदेशीर सल्ला घेऊन ठाकरे व शिंदे गटाकडून आलेल्या अर्जावर निर्णय घेण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्तांनी स्पष्ट केले.

शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा होतो. शिवसेना नाव व धनुष्यबाण निशाणी आमच्याकडे आहे त्यामुळे प्रथा परंपरेनुसार शिवसेनेला शिवाजी पार्क मिळायलाच हवे,

अशी आग्रही भूमिका शिंदे गटाची आहे, तर शिवाजी पार्कवर प्रथा परंपरेनुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार, यावर ठाकरे गट कायम आहे. त्यामुळे आता पालिका काय निर्णय घेणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment