
धक्कादायक: पिंपळी येथील तरुण फोटोग्राफर प्रतीक (सन्नी) यादव यांचे ‘सनस्ट्रोक’ व हृदयविकाराच्या झटक्याने निधन; परिसरात हळहळ
येथील एक उमदा,कष्टाळू आणि मनमिळाऊ तरुण फोटोग्राफर प्रतीक तानाजी यादव (वय २९, रा. पिंपळी) यांचे मंगळवार, दिनांक १९ मे २०२६ रोजी दु:खद निधन झाले. वॉटर पार्कमध्ये फिरायला गेले असताना तीव्र उष्माघात (सनस्ट्रोक) झाल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला,ज्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण पिंपळी परिसर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.फोटोग्राफी क्षेत्रात अल्पावधीतच मिळवले होते मोठे नावप्रतीक यांचे वडील हे मूळचे शेतकरी आहेत.घरात शेतीची पार्श्वभूमी असतानाही,प्रतीक (सन्नी) यांनी आपल्या अंगभूत कलेच्या जोरावर फोटोग्राफी क्षेत्रात पदार्पण केले होते. अत्यंत कमी वयात त्यांनी आपल्या उत्कृष्ट फोटोग्राफीच्या जोरावर परिसरात स्वतःचा मोठा नावलौकिक आणि ब्रँड निर्माण केला होता.व्यावसायिक कौशल्यासोबतच केवळ आपल्या स्वभावामुळे त्यांनी प्रचंड मोठा मित्रसमुदाय जोडला होता. ‘फोटोग्राफी करणे आणि माणसे जोडणे’ हे त्यांचे मुख्य कसब होते.वॉटर पार्कमध्ये घडली दुर्दैवी घटनामिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक हे आपल्या मित्रांसोबत वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी गेले होते. मात्र,सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांना अचानक ‘सनस्ट्रोक’ (उष्माघात) चा मोठा फटका बसला.त्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका (हार्ट फेल) आल्याने त्यांची तब्येत खालावली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.एका हसत्या-खेळत्या तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगरप्रतीक (सन्नी) यादव यांच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा आणि एक विवाहित बहीण असा मोठा परिवार आहे. एकुलत्या एक तरुण मुलाच्या निधनाने शेतकरी पित्यासह संपूर्ण यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.