
राजगुरुनगर :
मानवतेला काळीमा फासणारी घटना काल राजगुरुनगर शहरात घडली.एका परप्रांतीय नराधम कडून गरीब कुटुंबातील दोन अल्पवयीन सख्या बहिणीची हत्या करून एकीवर अत्याचार केल्याने संपूर्ण राजगुरुनगर शहर या घटनेने हादरले होते.प्रत्येक नागरिकांमध्ये या घटनेने संतप्त भावना निर्माण झाली आहे.नराधम आरोपीस जलद गतीने खटला चालून कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंब ,आंदोलक बरोबरच शहरातील हुतात्मा राजगुरू फाऊंडेशन,माऊली प्रतिष्ठान,शिवसेना ग्राहक हक्क कक्ष,वैदू समाज आदी संघटना प्रतिष्ठान यांनी त्या बाबत चे निवेदन दिले आहे.
यावेळी हुतात्मा राजगरू फाऊंडेशन च्या वतीने निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.या निषेध सभेत शहरातील राजकीय सामाजिक,शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते