Spontaneous response to youth leader Shri Jaydada Ajitdada Pawar’s first public darbar; Large crowd of citizens

Photo of author

By Sandhya

युवानेते श्री जयदादा अजितदादा पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांची मोठी गर्दी

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते श्री जयदादा अजितदादा पवार यांनी आज बारामती येथे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी जनता दरबाराची सुरुवात केली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आपल्या विविध समस्या जय पवार यांच्यासमोर मांडल्या.

जनतेच्या अडचणी समजून घेत श्री जय अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दूरध्वनीद्वारे सूचना देत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला.

बारामतीतील नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी श्री जय अजितदादा पवार जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page