राजगुरुनगर मध्ये कडकडीत बंद,चिमुरडीच्या हत्या व अत्याचार घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा

Photo of author

By Sandhya


राजगुरुनगर येथे कार्तिकी व दुर्वा या सख्या चिमुकल्या बहिणीची हत्या व अत्याचार घटनेच्या निषेधार्थ राजगुरुनगर वासियानी कडकडीत बंद ठेऊन पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळण्यासाठी व आरोपीस फाशी मिळावी या मागणीसाठी शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला.या निषेध मोर्चात सर्व समाजातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील हुतात्मा राजगुरू ,भगतसिंग सुखदेव यांच्या स्मृती स्थळापासून निघालेला निषेध मोर्चा शहरातून तहसीलदार कार्यालय जवळ निवेदन देऊन संपन्न झाला.यावेळी सुधाताई कोठारी, विजया शिंदे,अतुल देशमुख,भगवान पोखरकर,विजय डोळस,कैलास दुधाळे,आदींनी संतप्त भावना व्यक्त करून या घटनेचा निषेध केला.पीडितांच्या न्यायासाठी दोन दिवस उपोषणास बसलेले भटक्या विमुक्त समाजाचे अध्यक्ष संजय कदम यांनी आभार मानले.

Leave a Comment

You cannot copy content of this page