सुप्रिया सुळे : मराठी माणसाविरोधात भाजपचे कटकारस्थान

Photo of author

By Sandhya

सुप्रिया सुळे

मराठी पक्षांच्या आणि मराठी माणसाविरोधात कटकारस्थान करण्याचे काम भाजप करीत आहे. त्यामुळेच त्यांनी मराठी नेत्यांचे पक्ष फोडले, असा आरोप राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार माझे मोठे बंधू आहेत आणि माझ्यावर जे संस्कार झाले, त्यानुसार मोठ्या बंधूंचा मानसन्मान केला गेला पाहिजे. त्यामुळे अजितदादांविरोधात कधीच भूमिका मांडली नाही आणि मांडणारही नाही, असेही त्या म्हणाल्या.

खा. सुळे यांनी शनिवारी शहरातील विविध गणेश मंडळांना भेट दिली व आरती करून दर्शन घेतले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राष्ट्रवादीचा चेहरा आणि त्याची ओळख कोण असेल तर ते फक्त शरद पवार साहेब आहेत.

विधानसभेचे अध्यक्ष कालच दिल्लीला जातात आणि कालच आमच्यातल्या एका मंत्र्याने आमदार अपात्र करण्यासाठी याचिका करणे, हा केवळ योगायोग नाही. याच्यामागे दिल्लीचा अदृश्य हात आहे. 

Leave a Comment