सुप्रिया सुळे : दडपशाहीला मतदारांनी नाकारले…

Photo of author

By Sandhya

सुप्रिया सुळे

‘‘राज्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण असून, शेतीला पाणी नाही. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि महागाई वाढत असून, भ्रष्टाचाराचा हिशेब लागत नाही.

आयकर विभाग, सीबीआय आणि ईडीच्या दडपशाहीला मतदारांनी नाकारले आहे,’’ असे मत नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी व्यक्त केले. दरम्यान, उद्यापासून (ता. ७) आमदार रोहित पवार यांच्यासमवेत बारामती परिसरातील दुष्काळाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामती मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच पुण्यातील निसर्ग या त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात आल्या.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. या वेळी पुण्यातील आणि मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

सुळे म्हणाल्या, ‘‘राज्यातील महाविकास आघाडीचा विजय हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. महागाई, दुष्काळ, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी मोठी आव्हाने राज्याच्या समोर होती.

दुधाचा भाव शहरात वाढलेला असून ग्रामीण भागात मात्र कमी झालेला आहे. राज्यभर दुष्काळाची परिस्थिती असून, अनेक ठिकाणी छावण्यांची मागणी होत आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकारला धारेवर धरणार आहोत. ’’

सुप्रिया सुळे म्हणाल्या…

सत्तास्थापनेसाठी ‘मॅजिक फिगर’ नसल्याने इंडिया आघाडी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत माझी लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, ती वैचारिक आहे कल्याणीनगरच्या घटनेत आमदार रवींद्र धंगेकरांमुळेच पोलिसांना कारवाई करावी लागली सुनेत्रा वहिनी या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच राहील पार्थ आणि जय हे माझ्या मुलासारखे आहेत

Leave a Comment

You cannot copy content of this page