जेजुरीत जिजामाता संकुलात तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात सुरू

Photo of author

By Sandhya



पुणे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग तसेच पंचायत समिती पुरंदर शिक्षण विभाग व जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल जेजुरी यांच्या वतीने ५२ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन २६ व २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे सचिव माजी शिक्षणाधिकारी दत्तात्रय गवळी,मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते विश्वस्त मंगेश घोणे, यांनी केले.

आलेल्या मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर तसेच जिजामाता मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरिता कपूर यांनी केले.

यावेळी पत्रकार बी.एम. काळे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे,सेकंडरी बँक मुंबईचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,न्यू.इंग्लिश स्कूल जवळार्जूनचे प्राचार्य उत्तमराव निगडे,हरणी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकरराव जगताप,माहूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालयाचे प्राचार्य युवराज घोळवे ,महर्षी वाल्मीक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक चव्हाण,पत्रकार सुनिल वढणे,जिजामाता प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून विलास वंजारी , संतोष आवारी ,प्रभावती काळे , अलका पाटेकर हे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत काम पाहणार आहेत.


यावेळी संस्थेचे सचिव व माजी शिक्षणाधिकारी दत्तात्रय गवळी म्हणाले की,विद्यार्थांच्या मनामध्ये चिकित्सक वृत्ती असली पाहिजे,निरीक्षक वृत्ती असली पाहिजे,विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक साहित्य निर्मिती केली पाहिजे,प्रत्येक विद्यालयातून बाल साहित्यिक निर्माण झाले पाहिजे,विद्यार्थ्यांनी मेहनत करून नवनवीन प्रयोग तयार केले पाहिजेत,आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील समस्या शोधून त्या समस्येवर मात करण्यासाठी संशोधन करून नवनवीन प्रयोग सादर केले पाहिजे.त्यावेळी निबंध व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलोफर इनामदार व स्नेहल भोसले यांनी केले,तर आभार नंदिनी गांजुरे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन पांडुरंग आटोळे,सारिका शेंडकर, वर्षा देसाई यांनी केले.






Leave a Comment

You cannot copy content of this page