खेड | भयानक ! चिमुकल्या बहिणींवर आधी अत्याचार केले मग पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये भरून ठेवले

Photo of author

By Sandhya

खेड : दोन लहान मुलींवर अत्याचार करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी (दि २६) उघडकीस आला. नऊ आणि आठ वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत, त्यालगत असलेल्या एका बियर बारमध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह सापडल्याचे बोलले जात आहे.

कार्तिकी आणि दुर्वा या बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला; मात्र मिळून न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती. दोघी सख्या बहिणी असुन बाहेरगावाहून मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचे समजते. हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार खेड पोलीसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळ लगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळून आल्या असे सांगण्यात आले. दोघींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदणासाठी नेण्यात आले. हरवलेल्या तक्रारीची शहानिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळून आल्या आहेत. याची सखोल चौकशी सुरू आहे, असे पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले. त्यांच्यावर अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असेही ते म्हणाले.

दरम्यान, राजगुरुनगर येथील धनराज बार मधील वेटरने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली. संशयित आरोपी हा ५० ते ५५ वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार दिला. मुलींच्या आईचे व खूनी वेटरचे प्रेमसंबंध जुळले होते. त्यातून वेटरने हा अघोरी प्रकार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

घटनाक्रम
आरोपी वरच्या मजल्यावर राहतो. मोठी मुलगी वर गेली असता तिच्यावर आरोपी बळजबरी करू पाहत होता. ती मोठ्याने ओरडली म्हणुन लहान मुलगी धावत वर आली. बिंग फुटणार म्हणून लहान मुलीला बेडरूम मध्ये कोंडून दुसरीला समजावत असताना त्याच्याकडून तिचा खून झाला. खून केल्याचे दुसरीला समजले असल्याने तिलाही आरोपीने ठार केले. दोघींना बॅरल मध्ये टाकून तो पळून गेला.अत्याचार झाला की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही

आई वडील, नातेवाईक यांना घेऊन महिलांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा, ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.मोठया मुलीवर बलात्कार , तो करण्याआधी लहान मुलीला हौदात बुडवून आरोपीने ठार केल्याचे समजते अघोरी कृत्य करून त्यातच मोठया मुलीला टाकून आरोपीने पलायन केले.अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांची खेड पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती.

Leave a Comment