तांबेवाडी येथील किशोर तांबे यांची निघृण हत्या

Photo of author

By Sandhya

बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी किशोर तांबे राहणार तांबेवाडी तालुका जुन्नर हे रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार आळेफाटा पोलीस स्थानक मध्ये देण्यात आली होती.


किशोर तांबे हे बेल्हे सोसायटीचे संचालक होते त्यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेत आपला अर्ज देखील नुकताच दाखल केला होता.त्यामुळे तांबे यांचा घातपात नक्की कोणत्या कारणामुळे झाला अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरु झाली आहे.


दरम्यान पोलिसांच्या चौकशी वरून किशोर तांबे यांचे चुलत बंधू संतोष तांबे यांनी म्हटले होते की रात्री दूध घालण्यासाठी समर्थ दूध डेअरीमध्ये किशोर तांबे व त्यांचे बंधू यांची भेट झाली होती त्या ठिकाणाहून ते दोघे घरी परतल्यानंतर किशोर तांबे हे त्यांची दुचाकी एम एच 15 सी एन 92 18 21गाडी घेऊन ते रात्री आठ वाजता शेतात जातो असे सांगून गेले होते मात्र सहा एप्रिल रोजी सकाळी पर्यंत घरी न आल्यामुळे सर्वांनी शेतात जाऊन त्यांच्या दुचाकीचा शोध घेतला परंतु मोटरसायकल ही दिसून आली नाही.

अदयाप त्याचा शोध लागला नसल्याने त्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी तक्रार दिनांक 6 एप्रिल रोजी आळेफाटा पोलीस ठाण्यात केली.
यावरून आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा तपास सुरू करून पोलिसांनी दिलेल्या वर्णनावरून त्याचा शोध सुरू केला मात्र ते सापडले नाही.

अखेर शुक्रवार दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी त्यांचा मुर्तदेह त्यांच्या शेताजवळील असलेल्या विहिरीत आढळून आला एका गोणीमध्ये हा मोठा मूर्तदेह सापडला.त्यानंतर मुर्तदेह विहिरीतून काढून शवविशेदनासाठी आळे येथे पाठवण्यात आला असून हा घातपात झाला असल्याची चर्चा तांबेवाडीत जोरदार सुरु झाली आहे.


या संदर्भात पोलिसांनी कुठलीही माहिती दिली नाही नेमका हा घात कशामुळे झाला याविषयी माहिती अदयाप दिली नाही परंतु पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असे माहिती देखील मिळाली आहे परंतु अद्याप हा घातपात नेमका कुठल्या कारणामुळे झाला आहे अद्याप समजू शकले नसले तरी पोलिसांकडून लवकरच माहिती मिळेल अशी अपेक्षा निर्माण होत आहे.

Leave a Comment