देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता उर्वरीत टप्प्यांसाठी जकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. यात सध्या आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी देखील प्रचाराला सुरूवात केली आहे. आज शनिवारी, तानाजी सावंत धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे.
काय म्हणाले तानजी सावंत? महाराष्ट्रात भाजपचे सर्वाधिक आमदार असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. आता आगामी काळातही शिंदेच मुख्यमंत्री असतील. २०२४ आणि २०२९ पर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडेच महाराष्ट्राचं नेतृत्व असणार आहे, असा ठामपणे विश्वास व्यक्त केला आहे.
तानजी सावंत यांच्या या विधानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याशिवाय यावेळी तानाजी सावंत यांनी आम्हीच खरी शिवसेना असून उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली असल्याचा टोला देखील लगावला.