….तोपर्यंत निवडणूका घेऊ नका : आमदार संजय जगताप

Photo of author

By Sandhya

आमदार संजय जगताप

पुरंदर विधानसभा मतदारसंघातील बुथ क्रं १ ते ४१० या सर्व बुथ मधील दुबार आणि मयत मतदारांची नावे कमी करण्याबाबत मी गेली पाच वर्षांपासून पत्रव्यवहार करीत आहे., त्याबाबत आणि यापुर्वी आलेल्या हरकतींवर कारवाई करावी.

बोगस मतदारांवर कारवाई करावी, तळापर्यंत जावून सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी आमदार संजय जगताप यांनी तहसीलदार विक्रम रजपूत यांच्याकडे करून सर्व बोगस, दुबार, मयत नावे वगळून नवीन मतदार यादी तयार करावी….तोपर्यंत निवडणूका घेऊ नये अशीही मागणी आ जगताप यांनी केली.


शासनाच्या अधिका-यांनी पुरंदर तालुक्यातील ३२ हजार नागरीकांना नोटिसा देऊन त्यांना दि ४ रोजी सासवड येथे उपस्थित राहण्याबाबत केलेल्या सुचनेबाबत आमदार संजय जगताप यांनी तहसीलदार विक्रम रजपूत यांना निवेदन दिले आहे.

यावेळी आ संजय जगताप यांनी तहसीलदार रजपूत यांना, शासनाने दि ४ रोजी ३२ हजार नागरीकांना एकत्र बोलाविले असून सध्याच्या तहसील कार्यालयातील गैरसुविधा पाहता येथे नागरीकांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही, त्यामुळे सर्व ३२ हजार नागरीकांची त्यादिवशीची नाष्टा – जेवणाच्या व्यवस्थेसह एका दिवसाच्या रोजंदारीचीही व्यवस्था करण्याची मागणी केली.


शिवतारेंच्या बोगस आरोपांचा समाचार घेताना त्यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष लोळे व कुटुंबीय आणि युवक अध्यक्ष बडदे यांची नावे सासवड – पानवडी आणि सासवड – कोडीत येथे असल्याचे व लोळे यांनी २०१९ च्या निवडणुकीत दोन ठिकाणी मतदार केल्याचे पुराव्यानिशी दाखवून देत या दोघांवर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला.

याबरोबरच आता गावोगावच्या नागरीकांना दिलेल्या बोगस मतदारांच्या नोटीसांमध्ये लोळे व बडदे यांना नोटीस का दिली नाही. वाघापूर ग्रामपंचायती सारख्या काही ग्रामपंचायतींनी दुबार नावे कमी करण्याच्या पत्रावर अद्याप का कारवाई झाली नाही अशी विचारणा करीत लोळे आणि बडदेंसारख्यां आणखी बोगस मतदारांचा शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जगताप, पवार, खैरे बोगस काय….

बोगस मतदारांच्या आलेल्या नोटीसांमध्ये सासवडमधील जगताप, वाल्हेतील पवार, कोडीत मधील खैरे आदींचा समावेश असून जगाच्या पाठीवरील अनेक जगताप हे सासवडचे आहेत.

पवार मंडळी वाल्हे गावातील असून खुद्द खा शरद पवारही वाल्हेतील पवार आमची भावकी असल्याचे सांगतात. तसेच खैरे मंडळी कोडीतमधील असून १९६२ ते १९७२ मध्ये पुरंदरचे आमदार असलेल्या स्व बापूसाहेब खैरे यांच्या घरातील आहेत. मग ही मंडळी सांगलीतील आणि बोगस कशी असा प्रश्न आमदार संजय जगताप यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयुक्तांकडे जाणार….

याप्रसंगी तहसीलदार रजपूत यांनी निवडणूक आयोगाकडून आलेल्या सुचनेप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करीत आहोत असे सांगितले. यावर आमदार संजय जगताप यांनी, नोटीस बजावलेल्या सर्व नागरीकांची दिवसभरातील जेवण आणि रोजंदारीची व्यवस्था करावी अशी मागणी करीत., ही मागणी पुर्ण न झाल्यास आपल्याला सुचना करणा-या निवडणूक आयुक्तांकडे जाऊन मागणी करणार असल्याचे आ जगताप यांनी सांगितले.

Leave a Comment