जेजुरीत दुर्दैवी घटना : सेफ्टी टँकमध्ये बुडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

जेजुरी वार्ताहर दिनांक 18 पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील दवणेमळा परिसरात सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दीड वर्षीय चिमुकला सकाळी घरातून अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी शोध घेतल्यानंतर घराजवळील सेफ्टी टँकमध्ये तो आढळून आला.चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली .
सदर मृत दीड वर्षाच्या चिमुकल्यांचे नाव शिव अविनाश हितापूर असे असून मयत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे हरसगुडी, ता. चिंचोली, जि. कलबुर्गी (कर्नाटक) येथील असून त्याचे कुटुंबीय मोल मजुरीसाठी येथे आले आहे.

असून जेजुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

घर परिसरातील सेफ्टी टँक, विहिरी, पाण्याचे खड्डे व इतर धोकादायक ठिकाणे सुरक्षित झाकून ठेवावीत. लहान मुलांवर क्षणभरही दुर्लक्ष होणार नाही, याची प्रत्येक पालकांनी विशेष काळजी घ्यावी.असे आवाहन जेजुरी पोलिसांनी केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page