Two-day training of officers and employees appointed for Baramati Assembly by-elections completed

Photo of author

By Sandhya

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनाचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
बारामती,दि.१३: बारामती विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघातील मतदान केंद्रांवर नियुक्त केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर सहायक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळणी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी दिनांक ११ आणि १२ एप्रिल रोजी प्रशिक्षण संपन्न झाले . दोन दिवस दोन सत्रामध्ये हे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये पहिल्या दिवशी १२४८ आणि दुसऱ्या दिवशी ६४८ असे ऐकून १८९६ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.
निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन करताना मतदानाची प्रक्रिया, ईव्हीएम यंत्र हाताळणी, ईव्हीएम यंत्रांची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, अभिरुप मतदान, ईडीसी मतदान प्रक्रिया, दिव्यांग मतदारांचे मतदान, मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे अहवाल, निवडणुकी विषयक कागदपत्रे आदीबाबत सादरीकरणाद्वारे सखोल माहिती दिली. या निवडणुकीमध्ये माहिती ECINET या मोबाइल अँप द्वारे माहिती भरायची आहे. हे अँप सर्व भाषेमध्ये असून इंटरनेट नसताना सुद्धा ते हाताळता येणार आहे. याबद्दल मार्गर्दशन केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी चोखपणे पार पाडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, निवडणुकीचे कामकाज अतिशय गांभीर्याने घ्यावे यामध्ये कोणताही बेजबाबदारीपणा चालणार नाही अशा त्यांनी सूचना दिल्या.
कर्मचाऱ्यांचे गट करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी विविध वर्गखोल्यांमध्ये ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक त्यांना करून दाखविले. यामध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राची जोडणी, हाताळणी, यंत्र चालू व बंद करणे तसेच सील करणे याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षणाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, किशोर माने नायब तहसीलदार नामदेव काळे, भारत भिसे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page