महाराष्ट्रात मत पाहिजे असतील तर, मोदी या नावावर मिळू शकत नाहीत. ठाकरे या नावावरच मते मिळतात. म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला, काही फरक पडत नाही.
आज आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत आहेत, घेऊन जा, अशी टीका करत मी आणि माझी जनता समोरा समोर आहोत तेवढे मला पुरे, असे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे सोमवारी नांदेड दौ-यावर आले होते. यावेळी खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राज्य संघटक एकनाथ पवार आदीं उपस्थित होते.
तत्त्पूर्वी ते उमरखेडवरून हदगाव, अर्धापूर फाटा येथे भेट देवून पिंपळगाव महादेव येथील अनसूया मंगल कार्यालयात दुपारी संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
2009 व 2014 मध्ये नरेंद्र मोदीं यांनी जाहीर केलेल्या जाहीर नाम्याची पडताळणी करा, योजनांचा किती जणांना लाभ मिळाला ते विचारा. प्रधानमंत्री आवास नाही आभास योजना आहे. पिक विमा योजना,आपत्ती काळातील मदत मिळाली का? शेतक-याच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली का?, लागवडीचा खर्च वाढला आहे.
यांच्याकडेच अस्सल बियाणे नाही ते शेतक-यांना काय देणार, असा प्रश्न उपस्थित करून आमचे हिंंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. घरातील चुली पेटविणारे आमचे हिंंदुत्व आहे तर, भाजपचे घर पेटवणारे आहे.
भाजपला सत्तेचा हव्यास आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ, मिळून तिथे खाऊ, अशी भाजपची निती आहे, अशी टीका त्यांनी केली. विचारांची पेरणी करा, मोदींच्या थापा जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले. दोन दिवसात उमेदवार जाहीर होणार लोकसभा निवडणूकीचे महाविकास आघाडीतील जागा वाटप झाले आहे.
यात चुका करून चालणार नाही. पक्ष न पहाता हुकूम शाहीला गाढावे लागेल. येत्या दोन दिवसात उमेदवारांची नावे जाहीर होतील,असेही ठाकरे म्हणाले. भाजपने राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे.
उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणार्या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला.
छट पुजेला विरोधी करणारे, उत्तर भारतीयांना मारहाण करणार्या तसेच नेहमी उत्तर भारतीयांचा द्वेष करणार्या राज ठाकरे यांच्या मनसेला भाजपने निवडणुकीसाठी महायुतीत घेत आहे, हा तमाम हिंदी भाषकांचा अपमान आहे, त्यांच्याशी गद्दारी असल्याचेही लोंढे म्हणाले.