उपमुख्यमंत्री अजित पवारांची अभिषेक घोसाळकर प्रकरणी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,”कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला”

Photo of author

By Sandhya

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नरोन्हा याने गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आणि राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे, आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी,’माणूसकीला काळीमा फासणारी घटना आणि अशा घटना कोणत्याही शहरात होता कामा नये, तपास व्यवस्थित व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहे. त्यावेळी ते अभिषेक घोसाळकर प्रकरणी माध्यमांशी बोलत होते. या प्रकरणी बोलताना अजित पवार यांनी, ‘सध्या राज्यात वेगवेगळ्या कारणांवरुन गोळीबार सुरु आहेत.

अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली या प्रकरणाचा नीट तपास झाला पाहिजे. या प्रकरणावरुन विरोधक मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याच्या प्रयत्न करत आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. या प्रकणारावरुन आता विरोधक सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला माझं समर्थन नाही. या प्रकरणाचा संपूर्ण तपास व्हायला हवा, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. जमिनीच्या वादातून, पूर्ववैमनस्यातून आणि तिसरा गोळीबाराचे कारण समोर येईल.

विरोधक या प्रकरणावरुन आरोप करणार मात्र या तिन्ही वेगवेगळ्या घटना बघितल्या तर वेगवेगळ्या कारणावरुन झालेला गोळीबार आहे. राज्यात असे गुन्हे घडायला नकोत, त्यासोबतच हे गोळीबार खासगी पिस्तुलातून गोळीबार करुन झाले आहे. त्यामुळे यापुढे पिस्तूल देताना सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहे की नाही?, याची काळजी घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले.

या प्रकरणी योग्य तपास होऊन कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिस नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबुक लाइव्ह केले होते. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्याच कार्यालयात एका कार्यक्रमाकरता बोलावले होते. यानिमित्ताने ते फेसबुक लाइव्हवरून संवाद साधत होते.

संवाद संपल्यानंतर सुरुवातीला मॉरिस उठून निघून गेला. त्यानंतर, अभिषेक घोसाळकर लाईव्हद्वारे संवाद साधत होते. ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे, असे अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते.

त्यांचा हा संवाद संपताच अभिषेक घोसाळकरही जागेवरून उठले. ते उठताच त्यांच्यावर गोळीबार झाला. ते उठून गेल्यानंतर गोळ्यांचा आणि ओरडण्याचा आवाज व्हिडीओतून येत आहे. एवढेच नव्हे तर गोळीबार झाल्यानंतरही फेसबुक लाईव्ह पाऊणतास सुरूच होते.

Leave a Comment