पुण्यात कार अपघातात दोन तरुणांचा बळी गेल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्याप्राशन करून भरधाव मोटार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलामुळे दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला विशेष हॉलिडे कोर्टात हजर केले होते.
कोर्टाने काही तासांतच आरोपी मुलाला जामीन मंजूर केला. त्यावरून संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने मुलाला ताब्यात घेतले असून मुलाच्या वडिलांना, पब मालकाला अटक केली आली आहे.
अशातच या गंभीर प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तलयात बैठेक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुलाला या घटनेननंतर येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच नातेवाइकांकडून पिझ्झा बर्गर देऊन ‘त्याची’ सरबराई केली जात होती. असे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले होते. त्यावरून फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जर पोलीस ठाण्यात पिझ्झा बर्गर दिला असेल. हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. तर त्या पोलीस ठाण्यातील उपस्थित पोलिसांना बरखास्त केले जाईल, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषेदत दिला आहे.
लोकांमध्ये संताप आणि नाराजी फडणवीस म्हणाले, बैठक घेतली, काय घडलं आणि पुढची ऍक्शन काय आहे. अशी घटना घडू नये यासाठी उपाययोजना करत आहेत. पोलिसांनी कारवाई करत- रिमांड बाल न्यायालयात 304 लावला आहे.
स्पष्ट लिहिले आहे की, मुलगा आहे 17 वर्ष 8 महिने आहे. निर्भया कांडानंतर हिनस क्राईम म्हणून ऍक्ट आहे, रिमांड अप्लिकेशन आहे. त्यात तो अडल्ट आहे असे ट्रीट करा असे म्हणाले होते.
पण बाल न्यायालयाने भूमिका घेतली. आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी 15 दिवस अटी घातल्या आहेत. पोलिसांसाठी धक्का होता, पुरावे दिले आहेत, त्याने काय केले आहे, गाडीचे पुरावे दिले आहेत सर्व तरीही आश्चर्यकारक आहे.
प्रशासन आणि नागरिकांच्या विचार करायला लावणारी आहे. वरच्या कोर्टाने सांगितले बाल न्यायालयाकडे जावे लागेल असे सांगितले आहे. आता पुन्हा बाल न्यायालयात पुन्हा पोलीस अर्ज दाखल करतील. कोर्ट योग्य ऑर्डर देतील अशी अपेक्षा आहे.
पोलिस केवळ बघ्याच्या भूमिकेत भरधाव कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीच्या हातून गंभीर गुन्हा घडलेला असतानाही येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच नातेवाइकांकडून पिझ्झा बर्गर देऊन ‘त्याची’ सरबराई केली जात होती.
पोलिस केवळ बघ्याच्या भूमिकेत हाेते. त्या ठिकाणी त्याला झोपण्याचीही परवानगी देण्यात आली होती. मुलाच्या चेहऱ्यावर आपण काही गंभीर अपराध केला आहे असे कोणतेच भाव नव्हते. असे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.