पोलीस दलाची कार्यक्षमता वाहतूक व्यवस्थापनातही मदत आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हा झाल्यास तो जलदगतीने सोडविण्यासाठी त्याची मदत घेण्यात येणार आहे. याबाबतची यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
गुन्ह्याची वेगाने उकल करता यावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाने कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतला होता. त्यानुसार सरकारी कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी महाराष्ट्र रिसर्च अँड विजिलन्स फॉर एनहॅन्स्ड लॉ एन्फोर्समेंट लिमिटेड’ (मार्वल) बाबत सादरीकरण झाले.
फडणवीस यांच्यासह राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर यासंदर्भातील प्रारूपाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,
महाराष्ट्र पोलीस दल अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम करण्यासाठी आता ‘एआय’चा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये आम्ही सरकारची एक कंपनी तयार केली आहे. ही कंपनी आर्टिफिशियल (एआय) उपयोग कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासह गुन्ह्यांची उकल करण्यासाठी करेल.
वाहतूक व्यवस्थापनातही मदत वाहतूक व्यवस्थापनासाठी ‘एआय’ची मदत घेतली जाईल. त्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर यांच्यासोबत एक प्रोजेक्ट तयार करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.