पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून व शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक फंडातून ६० माध्यमिक विद्यालयांना प्रिंटर वाटप

Photo of author

By Sandhya

पुरंदर हवेलीचे  आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून  तसेच पुणे विभागाचे  शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक फंडातून पुरंदर तालुक्यातील  ६० माध्यमिक विद्यालयांना प्रिंटर वाटप पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सोमवार  ( दि.३) रोजी वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले.

शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांचे जुनी पेन्शन,शिक्षक भरती यासारख्या कामांना प्राधान्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले,पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी शिक्षकांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी केली.

यावेळी सेकंडरी बँकेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, कुंडलिक मेमाणे, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे कार्यवाहक  शिवाजी खांडेकर,पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले,पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर,पुणे जिल्हा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष विनय कोरे,संजय धुमाळ, मुख्याध्यापक संघाचे  अध्यक्ष रामदास शिंदे,माजी अध्यक्ष उत्तमराम निगडे,भगवान बेंद्रे,इस्माईल सय्यद , सचिव ,मधुकर जगताप, सह सचिव शांताराम राणे,पुरंदर तालुका काँग्रेस सेलचे अध्यक्ष प्रल्हाद गिरमे,सचिव जालिंदर घाटे,कार्याध्यक्ष रमेश 

बोरावके, पुरंदर तालुका  माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कारकर,सचिव दत्तात्रय रोकडे, कार्याध्यक्ष तानाजी शिर्के,पुरंदर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष प्रदीप दुर्गाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय रोकडे यांनी तर आभार पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर यांनी मानले.

Leave a Comment