पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सहा दिवसांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.
भ्रष्टाचाराचा आरोप असणारेच सत्तेत सहभागी झाल्याने सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी आता कुठे नेवून ठेवलेत, असा खडा सवाल विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केला.
चंद्रपूर शहर व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (दि.२१) आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते भाजपकरीता पवित्र कसे झाले. चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांनी, खूप मोठा सिंचन घोटाळा आहे, खूप पुरावे आहेत, असे म्हटले होते.
आता घोटाळ्यातील अर्धे मिळाले की, व्याज मिळाला, असा टोला लगावून ७० हजार कोटी कुठे नेवून ठेवलेत असा प्रश्न केला. राज्यात आता दोन अलीबाबा आणि ८० चोर आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला पण आता त्यांना रात्रभर झोप लागत नाही. खुर्ची जाऊ नये याकरीता कधी कधी स्वप्नात खुर्ची धरून ठेवतात. रोज खुर्चीकडे टक लावून पाहत आहेत.
ही खुर्ची कधी खाली होते आणि या खुर्चीवर आम्ही कधी बसतो, असे काहींना वाटत आहे. राज्याच्या तिजोरीची लूट चालली असून राज्याचे वाटोळे होत आहेत. काँग्रेसच्या काळात ऑनलाईन भरतीचे १०० शंभर रूपये घेतले जात होते.
आता ९०० रूपये घेतले जात आहेत. गोरगरीबांचे मुले ऐवढी फी कसे भरणार. त्यावेळी विद्यमान पालकमंत्री बोलत होते. आता एक शब्दही काढत नाहीत. उलट समर्थन करतात.
बेराजगारांना लुटण्याचे पाप सत्ताधारी करीत आहेत. जमा होणाऱ्या पैशाचा हिस्सा कोठे जातो. याचा जाब राज्यातील जनता सत्ताऱ्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.