विराट कोहलीला विकेट सेलिब्रेशन करणे पडले महागात; ठोठावला मोठा दंड

Photo of author

By Sandhya

विराट कोहलीला विकेट सेलिब्रेशन करणे पडले महागात; ठोठावला मोठा दंड

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सोमवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जकडून 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पडला.

सीएसकेने आरसीबीवर विजय मिळवताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातवरण पाहायला मिळाले. मात्र सामन्यानंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा धक्का बसला. विराट कोहलीने RCB विरुद्ध CSK सामन्यादरम्यान IPL आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळून आले, त्यानंतर मॅच रेफरीने त्याला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला.

शिवम दुबेच्या विकेटवर विराट कोहलीने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले होते, जे पाहून मॅच रेफरीने त्याच्यावर ही कारवाई केली.ही चूक कबूल केली आहे.

विराट कोहलीने आपली चूक मान्य केली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. असे आयपीएलने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page