राष्ट्रवादी माझी आणि मी राष्ट्रवादीचा; अजितदादांचे स्पष्टीकरण

Photo of author

By Sandhya

राष्ट्रवादी माझी आणि मी राष्ट्रवादीचा; अजितदादांचे स्पष्टीकरण

माझ्याबद्दल ज्या काही नाराज असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी चालविल्या जात आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधान भवनात पत्रकार परिषदेत केला.

सकाळपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्‍याच्या बातम्‍या येत होत्‍या. त्‍यावर त्‍यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्‍पष्‍ट केल्‍यानं राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.

कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. माझ्या सहकाऱ्यांबद्दलही गैरसमज पसरविले जात आहेत. ४० आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. मी राष्ट्रवादीतच राहणार आहे. भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चा निराधार आहेत अस त्‍यांनी सांगितलं.

शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची जडणघजडण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करत आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी अशा चर्चा घडवून आल्या जात आहेत.

Leave a Comment