पवार जिथे जातील तिथे मी जाणार; राष्ट्रवादी आमदाराची भूमिका जाहीर

Photo of author

By Sandhya

पवार जिथे जातील तिथे मी जाणार; राष्ट्रवादी आमदाराची भूमिका जाहीर

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू आहे. पवार यांच्या हा भूमिकेला पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी विधासनभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. ते जिथे जातील तिथे आम्ही जाऊ, असे सांगत त्यांनी पवार यांच्याबाबत जाहीर भूमिका घेतली आहे.

आमदार बनसोडे यांनी पवार यांना पाठींबा दर्शविला आहे. पवार यांनी आम्हाला मुंबईत बोलवले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. बनसोडे हे पवार यांचे समर्थक मानले जातात. पवार जिथे जातील तिथे मी जाणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment