अतिशय कौतुकास्पद; आर माधवनच्या मुलानं देशासाठी पुन्हा जिंकली ५ गोल्ड मेडल्स

Photo of author

By Sandhya

अतिशय कौतुकास्पद; आर माधवनच्या मुलानं देशासाठी पुन्हा जिंकली ५ गोल्ड मेडल्स

प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांतने ‘मलेशियन इनव्हीटेशनल एज ग्रुप चॅम्पियनशिप 2023’ मध्ये भारतासाठी पाच सुवर्णपदकं पटकावली आहेत. आर. माधवनने त्यांच्या ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

वेदांतच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. वेदांत हा स्विमर आहे. त्याने याआधिही उत्कृष्ट कामगिरी करून विविध पदके जिंकली आहे.

आर. माधवनने ट्वीट शेअर केले आहे की, ‘देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांने वेदांतने क्वालालंपूर येथे या शनिवारी आणि रविवारी आयोजित करण्यात आलेल्या भारतासाठी 5 सुवर्णपदकं (50, 100,200,400 आणि 1500 मी) जिंकली आहेत.’

आर. माधवनच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत वेदांतचे कौतुक केले असून त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते अभिषेक बच्चन यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की, ‘अमेझिंग, अभिनंदन, वेदांत’ तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कमेंट केली, ‘सूवर्णपदकं जिंकल्याबद्दल अभिनंदन, बेस्ट ऑलवेज’ दरम्यान, मध्य प्रदेशात पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्येही वेदांत माधवन याने जलतरण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती.

5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पटकावली होती. बहुतांश वेळा आपण पाहतो की, अभिनेत्यांची मुले ही अभिनय क्षेत्रातच पदार्पण करतात आणि आपले नावलौकिक करतात. मात्र, वेदांतने अभिनय क्षेत्र न निवडता क्रीडा क्षेत्रात तो आपले नावलौकिक कमवत आहे.

Leave a Comment