पुणे महापालिका दोन भागात विभाजित होईल का? चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Photo of author

By Sandhya

चंद्रकांत पाटील


पुण्यात होणार दोन महापालिका? मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान, काय म्हणाले…

पुणे महापालिकेची सीमासंवर्धीत गावांचा समावेश झाल्यानंतर प्रशासनावरील ताण वाढल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेचे विभाजन करण्याची भूमिका मांडली आहे. हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनीही पूर्व आणि पश्चिम पुणे महापालिका निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली आहे. दोघांनीही लवकरच या गोष्टीसाठी कार्यवाही होण्याची आशा व्यक्त केली आहे.

पुणे : महापालिकेत हद्दीलगतच्या गावांच्या समावेशानंतर राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेवरील प्रशासकीय ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता आणखी उशीर न करता पुणे महापालिकेचे विभाजन करावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मांडली. हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवडचा विकास वेगाने होत असल्याने तेथेही वेगळी पालिकेची गरज अधोरेखित करून, पुण्याच्या पूर्व व पश्चिम बाजूस स्वतंत्र महापालिका कराव्यात, अशी मागणी केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे शहरातील नवनिर्वाचित आमदार व मंत्र्यांसोबत वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना पाटील व तुपे यांनी ही भूमिका मांडली. पुणे महापालिकेच्या परिसरात प्रचंड वेगाने होणारे नागरीकरण पाहता व ३२ गावांच्या समावेशानंतर पालिका प्रशासनावरील वाढलेला ताण पाहता पुण्यासाठी आणखी एका महापालिकेची गरज आहे, ही भूमिका ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सातत्याने लावून धरली आहे. पाटील व तुपे यांनीही या भूमिकेचे समर्थने केल्याने सरकार लवकरच याबाबत सकारात्मक पाऊल टाकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
‘‘पीएमआरडीए’ ही काही महापालिका होऊ शकत नाही. त्यामुळे आता अधिक उशीर न करता नव्या महापालिकेचा प्रश्न मार्गी लावावा लागेल,’ असे पाटील म्हणाले. विभाजनाचा प्रश्न आला की नावावरून बरेच काही अडते. ‘पुणे’ या नावातच खूप काही दडले आहे. त्याला आर्थिक, सामाजिक, भौगोलिक कंगोरे आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी एखाद्या ‘एजन्सी’ला काम देऊन त्याचे स्वरूप तयार करून घ्यावे लागेल,’ असे पाटील म्हणाले

Leave a Comment