जुन्नर | शिवनेरी गडावरून पडून तरुणी जखमी

Photo of author

By Sandhya


शिवनेरी गडावर दर्शनासाठी आलेल्या सायन,मुंबई येथील समूहातील रोशनी पांडे वय 24 वर्षे ही तरुणी येथील घोडशाळेच्या छतावरून पाय घसरून खाली पडली.दि 8 डिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. या तरुणीचा अपघात झाल्याची माहिती शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमला फोनद्वारे देण्यात येताच त्यांची टीम 20 मिनिटात गडावर पोचली त्यांनी या मुलीवर प्राथमिक औषधोपचार करून सुरक्षितपणे खाली आणले व रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले,अशी माहिती टीमचे सदस्य रुपेश जगताप यांनी दिली.आतिफ सय्यद, मगदूम सय्यद, अली नासिर सय्यद, आदित्य चव्हाण, हर्ष जगताप, सोनाली साळवे,लखन डाडर,या जुन्नर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी ही कामगिरी पार पाडली. वनविभागाचे वनपाल नितीन विधाटे , पुरातत्त्व विभागाचे दाभाडे हेही यावेळी घटनास्थळी उपस्थित होते.

Leave a Comment