पुरंदर | पिंगोरी येथे सेवानिवृत्त सैनिकाचे ग्रामस्थांनी केलं स्वागत

Photo of author

By Sandhya

बैलगाडीतून मिरवणूक काढून ढोल लेझीमच्या साथीने स्वागत

पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी येथील एका सेवानिवृत्त सैनिकाचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलेय.. या गावातील मंगेश बबन शिंदे हे भारतीय सैन्य दलामध्ये 21 वर्ष सेवा केल्यानंतर सैन्य दलातून निवृत्त झाले.. ते आपल्या गावी आल्यावर गावातील ग्रामस्थांनी त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं…. पारंपारिक पद्धतीने बैलगाडी मधून या जवानाची आम्ही त्याच्या कुटुंबीयांची मिरवणूक करण्यात आली.. यानंतर गावातील शहीद स्मारकाला मानवंदना देण्यात आली.. यानंतर ग्रामस्थांनी या सैनिकाचा आणि त्याच्या कुटुंबियांचा सन्मान केला.. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखलं जातं आणि या गावातील प्रत्येक घरामधील एक व्यक्ती सैन्यांमध्ये आपली सेवा बजावत असतो.. ही अनेक वर्षाची परंपरा या गावात आजही जपली जाते.. सैन्यामध्ये सेवा बजवत असलेल्या जवानांना या गावांमध्ये विशेष महत्त्व आणि सन्मान दिला जातो…. मंगेश शिंदे याने ग्रामस्थांनी केलेल्या या स्वतःबद्दल ग्रामस्थांचे आभार मानलेत
व सैनिकी सेवेत रिस्क जरी असली तरी आपण ही सेवा एन्जॉय केल्याचं म्हटलं.. मात्र मागील 21 वर्षात गावाकडची माणसं आणि गावाकडच्या सामाजिक जीवन मिस केल्याबद्दल दुःखही व्यक्त केलय… असं असलं तरी सैनिकी जीवन छान असल्याचा त्यांनी म्हटलंय…

Leave a Comment