क्राईम नियंत्रण,कायदा व सुव्यवस्था व अवैद्य धंदे रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवणार – श्री.नारायण पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

Photo of author

By Sandhya

बारामती – बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मालमत्तेविषयी गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे तसेच अवैद्य धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी पंच पंचसूत्री कार्यक्रम खालील प्रमाणे राबविण्यात येणार आहे
1) तंटामुक्ती समिती कार्यन्वित करण्यात येणार असून त्या माध्यमातून शरीराविरुद्धचे गुन्हे व अवैध धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.गावातील शेतीचे वाद,बांधावरून,रोडवरून इत्यादी कारणावरून वादाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त समिती कार्यान्वित करण्यात येणार आहे.
2) ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून मालमत्तेविषयी चे गुन्हे व अवैद्य धंदे रोखणे – या माध्यमातून गावातील सर्व नागरिकांच्या मोबाईल मध्ये एकाच वेळेला कॉल दिला नंतर सर्व नागरिकां पर्यंत मेसेज जाणार आहे.त्या माध्यमातून मालमत्तेविषयीचे गुन्ह्यांना अवैध्य धंद्यांना प्रतिबंध करणे करिता ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
3) सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे – सर्व गावात तसेच महत्त्वाचे ठिकाणी ग्रामपंचायत माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच व गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा जेणेकरून गावात काही प्रकार घडल्यास त्याची उकल करणे सोयीचे होईल.
4) महिला सुरक्षा समिती – गावात महिला अत्याचाराचे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात येणार असून त्या माध्यमातून महिलांवरील अत्याचाराचे गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्यासाठी मदत होणार आहे.

तसेच याचबरोबर सर्व गावात,शाळेत बैठका घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे कोणत्याही गावात दारू,जुगार अशा प्रकारचे अवैद्य धंदा कोणी केल्यास त्याच्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page