शेतीच्या कामासाठी ३६ शेतमजुरांना ठेवले डांबून; मुकादमावर गुन्हा दाखल

Photo of author

By Sandhya

नारायणगाव: जळगाव व नाशिक जिल्ह्यातील आठ कुटुंबातील ३६ शेतमजुरांना दोन वर्ष बंधनात ठेवून, मारहाण करून धमकावून त्यांच्या इच्छेविरुद्ध कमी पगारात ऊसतोड व इतर कामे करून घेतल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वळती तालुका आंबेगाव येथील मुकादम खंडू भानुदास माने वय ३६ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

याबाबत शेतमजूर सुरेश रवींद्र सोनवणे वय 30, सध्या राहणार सुलतानपूर,फाईन मळा,ता. जुन्नर, मूळ राहणार भिलाटी आनंदनगर ,ता.एरंडोल ,जि.जळगाव यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जळगाव व नाशिक जिल्ह्यातील आठ कुटुंबातील ३६ सदस्य आरोपी खंडू माने याच्याकडे मे २०२४ पासून ऊस तोडणी व इतर कामासाठी आले होते. सुलतानपूर येथे झोपड्या बांधून या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

आरोपी माने याने फिर्यादीसह सुरेंद्र रवींद्र सोनवणे, दुर्गा सुरेश सोनवणे, जितू सुरेश सोनवणे, दादू संजू सोनवणे, संगीता दादू सोनवणे, राणी दादू सोनवणे,चांदनी दादू सोनवणे, दिव्या दादू सोनवणे, विनोद भगवान गायकवाड, सखू विनोद गायकवाड, सारिका विनोद गायकवाड, राधिका विनोद गायकवाड, नेहा विनोद गायकवाड, शंकर शामराव मोरे, उमा शंकर मोरे,सावन शंकर मोरे, अक्षरा शंकर मोरे, भगवान रामदास गायकवाड, रवी रामदास सोनवणे, लक्ष्मी नामदेव सोनवणे, राजेंद्र रामदास सोनवणे, सुरेखा राजेंद्र सोनवणे, कृष्णा राजेंद्र सोनवणे, रोशनी राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर देवचंद सोनवणे, दिव्या ज्ञानेश्वर सोनवणे, संगीता ज्ञानेश्वर सोनवणे, शिवा ज्ञानेश्वर सोनवणे, गंगाबाई ज्ञानेश्वर सोनवणे, उषा नामदेव सोनवणे, खुशी नामदेव सोनवणे, साई नामदेव सोनवणे, अनिल शिवाजी बर्डे, शिव अनिल बर्डे, कविता अनिल बर्डे, मोहन नामदेव सोनवणे या शेतमजुरांची आधार कार्ड, मोबाईल स्वतःच्या ताब्यात ठेवले.

मागील दोन वर्ष त्यांच्याकडून १२ ते १८ तास काम करून घेतले. मात्र ठरलेला पगार दिला नाही. हिशोब मागितल्यानंतर मारहाण, शिवीगाळ करून धमकावले.इच्छा नसताना देखील सुरेश सोनवणे यांच्यासह आठ कुटुंबातील ३६ शेतमजुरांकडून सक्तीने काम करून घेतले.याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे.आय.पाटील करत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page