5 राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार ; निवडणूक आयोग आज तारखा करणार जाहीर

Photo of author

By Sandhya

5 राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका यावर्षी होणार आहेत. यासंदर्भातील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे.

सोमवारी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग तारखांची घोषणा करेल. तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

लोकसभेच्या आधी पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांना महत्व आले आहे. या निवडणुकांच्या निकालावरुन देशातील जनतेचा कौल कुणाकडे आहे, याबाबत काही स्पष्टता मिळू शकणार आहे.

भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे.

Leave a Comment