51 दिवसाच्या आंदोलनाला यश; BARTI च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर

Photo of author

By Sandhya

गेल्या काही दिवसांपासून फेलोशिप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांची आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची बुधवारी सह्याद्री अतिथी गृह येथे चर्चा झाली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

त्याचबरोबर बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे पीएचडीसाठी पुढील वर्षापासून दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला देण्यात आले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले आहेत. तसेच यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page