Baramati Plane Accident: बारामती विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात
बारामती : बारामती विमानतळावर आज दुपारी शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान खाली उतरत असताना रनवेवरून घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजता कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे विमान बारामती विमानतळावर उतरत होते. त्याचवेळी विमानाचा ताबा सुटून ते रनवेच्या बाहेर घसरले….
