Headlines

दक्ष नागरिक व पोलिसाच्या सतर्कतेमुळे लहान अर्भकाचे प्राण वाचले

तांदूळवाडीत स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

बारामती – याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की 19 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याचे सुमारास पोलिसांना दक्ष नागरिकांनी फोन करून माहिती दिली की,तांदूळवाडी येथील जुन्या रेल्वे ब्रिज खाली एक लहान नवजात अर्भक दिसत आहे व ते रडत असल्याचा आवाज येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून तात्काळ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस कॉन्स्टेबल शाहरुख शेख हे 112 चे ड्युटीला होते त्यांना सदर ठिकाणी तात्काळ जाण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल शेख व पीएसआय अमोल कदम,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्या ठिकाणी लहान अर्भक पडलेले होते.तेथीलच एक जागरूक नागरिक यांनी त्या लहान बाळाला उचलून त्या ठिकाणी बाजूला गिरगाय सांभाळणाऱ्या लोकांच्या मदतीने त्याचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत होते.तेव्हा पोलिसांनी सदर स्त्रीअर्भकाला आपल्या बरोबर घेऊन सदरचे अर्भक आरोग्य महिला हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय बारामती येथे दाखल केले.सदर अर्भकावर सध्या उपचार चालू आहेत.अर्भक सुस्थितीत आहे आणि चांगल्या पद्धतीने खेळत आहे व त्याच्यावर उपचार चालू आहेत.सदर अर्भक ज्या महिलेने त्याचा त्याग करण्याचे उद्देशाने टाकून दिलेले आहे तिच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल शाहरुख शेख यांनी फिर्याद दिले वरून बारामती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आमलदार अमोल भोसले हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *