Headlines

सोमेश्वर च्या निवडणुकीत दादांच्या छायाचित्राचा किंवा नावाचा वापर करताना कुटुंबीयांची परवानगी लागणार….. अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे भूमिका….. सोमेश्वरच्या निवडणुकीत दादांचं नाव आणि फोटो वापरासाठी लागणार कुटुंबीयांची परवानगी…. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाच्या प्रेस नोट नंतर विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी हटवला अजित पवारांच्या फोटोचा बॅनर…..

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे बंडखोरी कायम असल्याचं स्पष्ट झाला आहे. आज उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असून दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत तत्पूर्वीच विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी वेगळी भूमिका बारामती तालुक्यातील वानेवाडी येथे स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन केलं आहे.

दरम्यान या मेळाव्यात पुरुषोत्तम जगताप यांनी स्वर्गीय नेते अजित पवार यांचा फोटो असलेला एक फ्लेक्स मंचावरती लावला होता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी परिस्थिती पत्रकाद्वारे स्वर्गीय नेते अजित पवार यांचे छायाचित्र किंवा त्यांचं नाव त्यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय वापरू नये असे स्पष्ट केल्यानंतर हा बॅनर मेळाव्याच्या कार्यक्रम स्थळावरून हटवण्यात आला आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता 21 संचालक पदाच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *