Headlines

लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलचा कानाडवाडीत होम टू होम प्रचार

कानाडवाडी – श्री सोमेश्वर सहकारी कारखाना लि. सोमेश्वरनगर पंचवार्षिक निवडणूक २०२६-२०३१ प्रचारात लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलच्या उमेदवारांना ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याच्या सभासदांचा मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे.कारखान्याचे माजी चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या मार्गदर्शनात कानाडवाडी येथे लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलच्या उमेदवारांचा सभासदांच्या होम टू होम प्रचार करण्यात आला.या प्रचार दौऱ्यात सभासदांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कारखान्याच्या विकासासाठी कानाडवाडीतील सभासद पुरुषोत्तम जगताप यांच्या कायम सोबत आहेत त्यासाठी शिट्टी चिन्हासमोर शिक्का मारून लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देणार असल्याचेही उपस्थित सभासदांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *