Headlines

चहाच्या किटली शिवाय कपबशी भरत नाही – युगेंद्रदादा पवार

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक

सोमेश्वरनगर – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक २०२६ श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून श्री सोमेश्वर मंदिर या ठिकाणी करण्यात आला.युगेंद्र पवार यांनी श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात दर्शन घेऊन सभासद वर्गास मार्गदर्शन केले.यावेळी चहाच्या किटली शिवाय कपबशी भरत नाही आणि शिट्टी ही सावध करण्यासाठी असते असा टोला युवानेते युगेंद्रदादा पवार यांनी इतरांना लगावला.श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याने पॅनलच्या सर्व उमेदवारांनी प्रचारास जोरदार सुरुवात केली आहे.शरदचंद्रजी पवार यांच्या दाखवलेल्या विकासाच्या दृष्टीने व कारखाना आर्थिक प्रगतीकडे नेण्यासाठी श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा,असे आवाहनही युगेंद्र पवारांनी केले. यावेळी सभासद,शेतकरी व पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *